जत | प्रकाश जमदाडे यांच्याकडून व्हसपेठ येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप |माडग्याळ | मौजे व्हसपेठ ता.जत येथे रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
येथील सुमारे 25 सावर कुंटुबिय ऊसतोडी करणारे,मोल मजुरी करून पोट भरणारे,घोंगडी व जेन अशा प्रकारचे छोटे उद्योग करणारे आहेत.कोरोनामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून संचारबंदी असल्याने यां कुंटुबियाचे सर्व कामधंदे बंद आहेत. 
त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून जमदाडे यांनी अशा सुमारे 140 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूच्या किटची वाटप केले.यावेळी सरपंच राम साळुंखे,ग्रामसेवक हुसेन पटेल,आरपीआय अध्यक्ष श्रीकांत हुवाळे,प्रतीक जमदाडे,अभय जमदाडे व पदाधिकारी उपस्थित होते.


प्रकाश जमदाडे यांच्याकडून व्हसपेठ येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.