पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का कायद्यानुसार कठोर कारवाई करा ; केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या 50 लाखांच्या विमा योजनेत पत्रकारांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई ; लॉकडाऊनच्या काळात कर्तव्य बजावत असणाऱ्या  पोलीसांवर हल्ला झाल्याचे निषेधार्ह प्रकार  देशभरात अनेक ठिकाणी घडले आहेत. जनतेच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणे ही समाज विघातक कृती असून अशा हल्लेखोरांवर मोक्का कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
दि. 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन आहे.  मात्र सध्याची परिस्थिती पाहता देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक शहरात कोरोना रुग्णसंख्या  कमी होत आहे. मात्र मोठया शहरात लॉक डाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. कोरोना ला रोखण्यासाठी लॉक डाऊन अजून काही काळ वाढण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या पर्यंत इत्यंभूत माहिती पोहोचविण्याचे काम इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे  पत्रकार करीत आहेत. नुकतंच मुंबईत पत्रकारांची कोरोना चाचणी पार पडली त्यात काही पत्रकार पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे  आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 50 लाखांच्या विमा योजनेत  पत्रकारांचा ही समावेश केला पाहिजे. पत्रकारांना ही 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण लाभले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
लॉकडाऊनचे नियम जनतेने पळाले पाहिजेत; व्यक्तींनी सुरक्षित अंतर राखून  डिस्टन्सचे नियम पाळले  पाहिजेत. राज्यात मुख्यमंत्री साहाय्यता निधीत भरीव मदत जमा होत आहे. त्या रक्कम चा योग्य उपयोग करण्याचे नियोजन केले पाहिजे. राज्यात एक ही व्यक्ती उपाशी राहता कामा नये याची केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे.असे ना रामदास आठवले आज फेसबुक लाईव्ह वर जनतेशी संवाद साधताना म्हणाले.