कोतेंबोबलादमध्ये तीन दिवस जनता कर्फ्यूकोतेंबोबलाद,वार्ताहर : विजापूरला लागून असलेल्या जत तालुक्यातील कोतेंबोबलाद येते कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी बुधवारपासून सलग तीन दिवस जनता संचारबंदी पुकारण्यात आली आहे.
त्यामुळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद करण्यात आली आहेत.सर्व रस्ते सुनसान झाले आहेत.
विजापूर शहर पासून अगदी काही किलोमीटर कोतेंबोबलाद हे गाव आहे.त्यामुळे वेगवेगळ्या वस्तू खरेदी,दवाखाने,विविध कामानिमित्त येथील नागरिकांना मोठा संपर्क आहे.सध्या विजापूर येथे कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.त्यामुळे जतच्या सिमेवरील गावात भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग रोकण्यासाठी उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून तीन दिवस कडकडीत गाव बंद ठेवण्यात आले आहे.

कोतेंबोबलाद ता.जत येथे जनता संचारबंदीमुळे रस्ते सुनसान बनले आहेत.