उल्लेखनीय | माडग्याळ मध्ये लिंबाजी माळी,महादेव माळी यांच्याकडून मोफत पाणी पुरवठा |


माडग्याळ, वार्ताहर :
माडग्याळ येथे ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे पाणी टंचाईमुळे होरफळणाऱ्या गावभागाला तरूणांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून मोफत पाणी पुरवठा करून दिलासा दिला आहे. माडग्याळ पाणी टंचाईही कायमची बाब बनली आहेत.त्यात गेल्या 15 दिवसापासून ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजेतून पाणी पुरवठा बंद आहे.लॉकडाऊनमुळे पाणी आणणे कठीण बनले होते.गावात पाणी येत नाही.लॉकडाऊनमुळे बाहेरून पाणी आणता येत नव्हते.त्यामुळे पाण्याविना हाल होत होते.गेल्या पंधरा दिवसापासून नागरिक पाण्यासाठी मरणयातना सहन करत होते. तरीही ग्रामपंचायतीचे डोळे उघडले नाहीत.गावातील नागरिकांचे हे हाल पाहून लिंबाजी माळी,महादेव माळी,कामाण्णा बंडगर,जेटलिंग कोरे,बिराप्पा चौगुले,विजय चौगुले यांनी पुढाकार घेत मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे.


माडग्याळ ता.जत येथे मोफत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल थांबले आहेत.