बंदमध्ये फिरणाऱ्या नागरिकांवर उमदी पोलीसाची कारवाई


उमदी,वार्ताहर : विजापूर,सोलापूर मध्ये कोरोना विषाणु प्रभाव वाढल्याने या भागाशी मोठा संपर्क असलेल्या जत पुर्व भागातील उमदी गेल्या तीन दिवसापासून 100 टक्के कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. या काळात फक्त आरोग्य सुविधा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. तरीही काही महाभाग विनाकारण बंद काळात गावातून फिरत होते.अशा सुमारे पाच जणांना उमदी पोलीसांनी कारवाईचा दणका दिला.मास्क नसल्याने शर्ट काढून तोंडाला बांधण्याची शिक्षा केली.तीन दिवस कडकडीत बंद काळात विनाकारण नागरिकांनी उमदीत बंद काळात फिरणाऱ्या यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली.