अँड.सी.आर.सांगलीकर यांच्याकडून जतेत जीवनावश्यक वस्तूचे 650 किटचे वाटप

0

जत,प्रतिनिधी ; उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांच्यावतीने जत तालुक्यातील गोरगरिब जनतेची जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी,यासाठी जत तालुका प्रशासनाला जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप करण्यात आले.

जत तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने या तालुक्यातील बहुतांशी लोक हे ऊसतोडीसाठी व अन्य कामासाठी बाहेरच्या राज्यात जात असतात.त्यातच जत तालुक्यात  कोणत्याही प्रकारचे उद्योगधंद्याचे साधन नाही.त्यामुळे या तालुक्यातील बहुतांशी लोक हे बेरोजगार आहेत.सद्या जगभर फैलावलेल्या कोरोनारूपी महामारीमुळे जगाची व देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे.त्याचा देशातील सर्वच राज्यानाही फटका बसला आहे. 

जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गुगवाडचे भूमिपूत्र व उद्योगपती सी.आर.सांगलीकर ग्रुपचे सर्वेसर्वा चंद्रकांत सांगलीकर यांनी जत तालुक्यातील गोरगरिबांना वाटप करण्यासाठी साडेसहाशे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्याचे ठरवून आज जतचे तहसिलदार सचिन पाटील यांच्याकडे शंभर जीवनावश्यक किट सुपूर्द केले. 

प्रभाकर सनमडीकर म्हणाले की, सी. आर.सांगलीकर फाऊंडेशनने जत तालुक्यातील गोरगरिबांना कोरोनाचे संकटात मदत व्हावी यासाठी हे जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे.पहिले शंभर किट जतचे तहसिलदार पाटील यांच्याकडे आम्ही सुपूर्द करण्यात आले आहेत.उर्वरित किट तालुक्यातील सेंटरिंग व गवंडी कामगार तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर, मातंग समाज व इतर गोरगरिबांना वाटण्यात येणार आहे. 

Rate Card

यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याकडे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या पोलीस बांधव (कोरोना वारियर्स) यांच्यासाठी सी.आर.सांगलीकर फाऊंडेशनच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे ,प्रशांत झेंडे,अशोक कांबळे,बंडू कांबळे,शंकर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांच्यावतीने 100 जीवनावश्यक किट तहसील सचिन पाटील यांच्याकडे देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.