कलावंतांना शासनाने 5 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेमुंबई ; आंबेडकरी लोकशाहीर; कवी गायक; वादक;  लोककलावंत; तमाशा कलावंत; नाट्य कलावंत; सिनेमा क्षेत्रातील सहकलावंत  या सर्व कलावंतांना लॉक डाऊनच्या काळात महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी  अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच ना. रामदास आठवले संपर्क साधणार  आहेत.
कलावंतांप्रमाणेच मुंबईतील डब्बेवाल्यांनाही 5 हजार रुपयांची आर्थिक मदत राज्यशासनाने तातडीने करावी. डब्बेवाल्यांसोबत राज्यात जेथे जेथे कलावंत आहेत तेथील सामाजिक संस्था;एनजीओ ; लोकप्रतिनिधी आणि व्यापारी वर्गाने पुढे येऊन आपल्या विभागातील  कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे किट मदत म्हणून द्यावे असे नम्र  आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.