उमराणीत शेततळ्यात बुडून चिमुकलीचा मृत्युजत,प्रतिनिधी : उमराणी ता.जत येथे घरासमोरील शेत तळ्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मुत्यू झाला.ईश्वरी वसंत खोत असे मृत्त चिमुकलीचे नाव आहे. शुक्रवारी (ता.7) सकाळी 11 च्या सुमारास घटना घडली.घटनेेची रात्री उशीरापर्यत घटनेची नोंद नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खोजानवाडी येथील वसंत खोत व शीतल खोत हे दांपत्य दोन मुलीसह शेतात राहतात.त्यांच्या पत्नी शितल ह्या प्रसूतीसाठी उमराणी येथे माहेरी आल्या आहेत. दोन वर्षीय ईश्वरीही त्यांच्या सोबत आहे.दरम्यान शितलचे नात्यातील मयत झाल्याने घरातील सर्वजण तिकडे गेले होते.घरात शितल व ईश्वरीच होत्या.ईश्वरी अंगणात खेळत होती.तिला दुध आणण्यासाठी शितल या घरात गेल्या.तेवढ्यात ईश्वर खेळत घरासमोरील शेततळ्यात पडली.शितल घरातून बाहेर येताच त्यांना ईश्वरी दिसेना त्यांनी इकडे तिकडे बघत शेततळ्यात पाहिले असता.ईश्वरी शेततळ्यात पडल्याचे दिसून आले.शितलने ईश्वरीला वाचविण्यासाठी आरडा-ओरडा केला.त्यावेळी शितलचा चुलत भाऊ मुऱ्याप्पा पुजारी धावत आला.शेततळ्यातून ईश्वरीला बाहेर काढले.मात्र तिला बाहेर काढण्यापुर्वीच तिचा मृत्यू  झाला होता.दरम्यान या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.