जतेत पुन्हा कचऱ्याचे ढिगारेजत,प्रतिनिधी : जत शहरातील कचरा पुन्हा काही दिवसापासून उचलला नसल्याने ढिग साठू लागले आहेत.नगरपरिषदेची स्वच्छता गाड्या सध्या थांबून आहेत.त्यामुळे नित्याने उचलला जाणारा कचरा पुन्हा पडू लागला आहे.शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे पुन्हा बनत आहेत.नगरपरिषद प्रशासनाने याबाबत कारवाई करून कचरा नित्याने उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.