आमदार सांवत यांच्याकडून जनतेची दिशाभूल ; माजी आमदार विलासराव जगताप यांचा आरोपजत,प्रतिनिधी : आमदार विक्रमसिंह सावंत यांनी निवडणूकीत तुबची बबलेश्वर पाणी योजनेच्या दिशाभूलीला फसून जनतेनी त्यांना आमदार केले.ते गाजर ठरणार आहे.त्याशिवाय आपल्या दारी हा उपक्रम घेवून पुन्हा तालुक्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरु केल्याचा घणाघाती आरोप जतचे भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केला.
माजी आमदार जगताप यांनी बुधवारी पंचायत समितीत पत्रकार बैठक घेतली.यावेळी जि.प.सदस्य सरदार पाटील,माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार,अजित पाटील आदी उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने शासन आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाते. या उपक्रमात आमदारांना सहभाग घेता येतो.मागच्या पाच वर्षात मीही असे अनेक उपक्रम राबवून शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून दिला होता.परंतु आ. सावंत यांनी 'आमदार आपल्या दारी' या नावाखाली प्रशासन महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.या उपक्रमात सर्व शासकीय यंत्रणेचा वापर करून तिथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार असतो.हे पुर्णत:चुकीचे आहे.सरकारी योजनांची माहीती व लाभ देताना तिथे पक्षीय लेबल असायला नको,परंतु जतेत तसा प्रकार घडत आहे. शिवाय आमदार आपल्या दारी या उपक्रमात अधिकाऱ्यांना सहभागी होता येत नाही.आमदाराकडून हे सर्वाची दिशाभूल केली जात आहे.
आ.विक्रमसिंह सावंत जनतेची दिशाभूल करून आमदार झाले आहेत.तुबची योजनेचे पाणी देतो म्हणून तालूक्यातील जनतेची फसवणूक केली आहे. आता असे लोकांना भुलवणारे उपक्रम राबवून पुन्हा फसवणूक करीत आहेत. त्यांनी हे करण्यापेक्षा पुर्व भागातील शेतकऱ्यांना तुबचीच्या पाण्याचे दिलेले अश्वासन पूर्ण करून दाखवावे असे, प्रतिआव्हान माजी आमदार विलासराव जगताप यांनी आमदाल सांवत यांना दिले आहे.
x