संकेत टाइम्सच्या आमदार विक्रमसिंह सांवत वाढदिवस विशेष पुरवणीचे प्रकाशन
जत,प्रतिनिधी : जतचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह दादा सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक संकेत टाइम्सने काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी चंद्रसेन सांवत,युवराज निकम,भूपेंद्र कांबळे,गणेश गिड्डे,गणी मुल्ला,प्रकाश करगणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सांवत यांच्या राजकीय कार्यावर फोकस टाकणाऱ्या या पुरवणीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.जत तालुक्याचे मुखपत्र असलेले दैनिक संकेत टाइम्स यांनी काढलेली पुरवणी वैशिष्ट्य पुर्ण असल्याचे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.


दैनिक संकेत टाइम्सने काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर