शिक्षकांनी सुसंस्कारित पिढी घडवावी | माजी आमदार विलासराव जगताप : हणमंत कांबळे गुरूजी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा

जत,प्रतिनिधी : हणमंतराव कांबळे गुरूजी यानी त्यांच्या शिक्षकी पेशामध्ये  सुसंस्कारित पिढी घडविण्याचे काम केले आहे,असे शिक्षक समाज बदलविण्याचे काम करतात,असे प्रतिपादन जतचे माजी आ विलासराव जगताप यांनी केले. 
ते येथील श्री.साईप्रकाश मंगल कार्यालय येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हणमंत कांबळे गुरूजी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे हे होते. 
जगताप पुढे म्हणाले की,हणमंतराव कांबळे गुरूजी यानी त्यांच्या शिक्षकी पैशामध्ये स्व:ताला मुलबाळ नसताना ही समाजातील मुलांना आपली मुले समजून त्यांना चांगले शिक्षण व संस्कार दिले. प्रत्येकाला वाटते की निवृत्ती नंतर आपले उर्वरीत आयुष्य चांगल्या प्रकारे जावे. परंतु हल्लीच्या काळात आपली मुले आपणाकडे पहाण्यासही तयार नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला मुलींची आठवण येते. मुलापेक्षा मुलीच आई वडिलांना जास्त जपतात. त्यामुळे प्रत्येकाला एकतरी मुलगी असायला पाहिजे.तसेच स्त्रियांनी देव, धर्म,बुवा बाबांच्या मागे न लागता विज्ञानवादी बनले पाहीजे. सत्यनारायणाची पूजा घालण्या ऐवजी आपली मुले कशी चांगल्या प्रकारे विज्ञानवादी. होतील याकडे लक्ष दिले पाहिजे.
यावेळी बोलताना सुरेशराव शिंदे म्हणाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हणमंत कांबळे गुरूजी यांच्या अमृतमहोत्सवी प्रसंगी त्यांना चांगले आरोग्य लाभो, कांबळे गुरूजी यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळून समाजासाठी योगदान दिले आहे.त्यानी सुसंस्कारित पिढी घडविण्याचे काम केले आहे. 
या प्रसंगी आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, प्रा.टि.एम.वाघमोडे, रासप नेते अजितकुमार पाटील,माजी पं.स.सदस्य सुभाष गोब्बी,शिवसेना नेते दिनकर पतंगे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी मुख्याध्यापक शिवाजीराव काळे,केशव सुर्वे सर,तुकाराम माळी यांची भाषणे झाली.हणमंतराव कांबळे गुरूजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आपणाला मुले नाहीत,माझ्या भावाची मुले हीच माझी मुले असून मुले नाहीत म्हणून मी दुसरे लग्न केले नाही. समाजासाठी आपले आयुष्य असेल असे ते म्हणाले. 
यावेळी वाढदिवसाचा केक कापून अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. कांबळे दांपत्याचा अमृतमहोत्सवी सत्कार माजी आमदार विलासराव जगताप,सुरेशराव शिंदे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून करण्यात आला.यावेळी जि.प.सदस्या सौ. स्नेहलता जाधव, प्रसिध्द धन्वंतरि मनोहर मोदी,उद्योगपती बाळासाहेब हुंचाळकर, ,गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने,उपकोषागार अधिकारी श्री. सुतार साहेब,सुधिर चव्हाण, नगरसेवक पट्टू गवंडी,श्रीकांत शिंदे,मोहन चव्हाण,सांगली जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे, शिक्षक नेते शिवाजीराव जाधव,सेनानेते अंकुश हुवाळे,माजी नगरसेवक गिरमल्ला कांबळे, आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे, प्रशांत ऐदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत कोळी सर यानी केले तर आभार लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजू कांबळे यानी मानले.


जत : सेवानिवृत्त मुख्याध्यापक हणमंत कांबळे गुरूजी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.