सुसलादमध्ये वाळू विरोधी मोठी कारवाई | 90 ब्रास वाळू,पोकलँड,डंपर,टँक्टर जप्त | 75 लाखाचा दंड

संख/बोर्गी,वार्ताहर : सुसलाद ता.जत येथे अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बेकायदा वाळू अड्ड्यावर संख अप्पर तहसील व उमदी पोलीसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत वाळू तस्करी करणाऱ्या जेसीबी,दोन डम्पर व दोन टँक्टरसह सुमारे 90 ब्रास वाळू जप्त करत आतापर्यतची मोठी कारवाई केली आहे.वाहनासह वाळूचा सुमारे 75 लाख ते 1 कोटीपर्यतचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.संख अप्पर तहसील कार्यालय हद्दीतील बोर नदी पात्रातील वाळू तस्करी रोकण्यासाठी अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी मोहिम हाती घेतली आहे. त्यांच्या कारवाई सापडणाऱ्या वाळू तस्कराला दंडाचा दणका दिला आहे. सोमवारी मध्यरात्री सोनलगी नजिक बोर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पिसाळ यांना मिळाली होती.पथकासह तहसीलदार पिसाळ व पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी छापा टाकला.त्यावेळी एक पोकलँड,एक ट्रेलर,एक डंपर,चाळणी बसविलेले दोन टँक्टर वाळू भरताना आढळून आले.पथक आल्याचे पाहता सर्व वाहनाच्या चालकांनी वाहने सोडून पळ काढला.वाहनासह साठा केलेली सुमारे 90 ब्रास वाळू पथकांने जप्त केली आहे.दरम्यान पोकलँड वरील चालक संभाजी म्हाळाप्पा दहिरणे यांच्याकडे चौकशी केली असता ती वाहने उमेश जयसिंगराव सांवत यांची असल्याचे त्यांने सांगितल्याचे पंचनाम्यात नमूद केल्याचे तहसीलदार पिसाळ यांनी सांगितले.दरम्यान अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सोनलगी बोर नदीपात्रातील बेकायदा वाळू तस्करीतील बड्या हस्तीवर कारवाई करत अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे.जप्त 90 ब्रास वाळूलाला 50 लाख तर वाहनाना सुमारे तीस लाखावर दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,सा.पो.निरिक्षक दत्तात्रय कोळेकर, संखचे मंडल अधिकारी कोळी शंकर बागेळी,सुसलाद तलाठी श्री.सांगोलकर,श्री.जगताप यांच्या पथकाने हि कारवाई केली.


सोनलगी ता.जत येथे जप्त केलेल्या वाहनासह पथक
Attachments area