जतेत जुगार अड्ड्यावर छापा, दोघे जुगारी ताब्यातजत,प्रतिनिधी : जत शहरातील जनावरा बाजाराजवळच्या तीन पानी जुगार अड्ड्यावर जत पोलीसांनी छापा टाकत चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.34 हजार 770 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.महेश सुरेश शिंदे(पाथरूट),बापू उर्फ प्रविण दत्तात्रय गिड्डे,विजय नाना माने,बाळकृष्ण काशिनाथ खाडे अशी अटक केलेली नावे आहेत.तर शिवाजी तायाप्पा चोरमुले,चेतनकुमार कांबळे हे दोघे फरार झाले आहेत.याप्रकरणी जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, जत शहरातील विजापूर रोडवरील जनावर जवळच्या एका शेडमध्ये काही जुगारे पैसे लावून तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती.त्यानुसार छापा टाकला असता सहाजण मिळून आले.त्यातील दोघे पळून गेले.चारजणाला ताब्यात घेत एक दुचाकी एमएच 10,एटी 7643या गाडीसह 34 हजार 770 रूपयाचा मुद्देमाल व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. अधिक तपास प्रविण पाटील करत आहेत.