माडग्याळ येथे प्रशस्त बसस्थानक बांधण्याची मागणी
माडग्याळ, वार्ताहर : माडग्याळ ता.जत हे तालुक्यातील महत्वाचे व जत-चडचण राज्य महामार्गावरील गाव आहे.ऐतिहासिक माडग्याळी मेंढी व माडग्याळी बोरासाठी प्रसिद्ध असणारे गाव. लगतच प्रसिद्ध श्री.दानम्मादेवी मंदिर,मंगळवेढा,सांगोला तालुक्याची हद्द यामुळे येथे दररोज हाजारो प्रवाशाची ये-जा असते.त्यामुळे येथे सुसज्ज बसस्थानक बांधावे अशी मागणी होत आहे. जत पुर्व भागातील संख,उमदी या परिसरातील मध्यवर्ती गाव म्हणून माडग्याळ परिचित आहे.माडग्याळ येथे तालुका करण्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरु आहे.त्या अनुषंगाने येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे.त्याशिवाय सांगली बाजार समितीचे येथे जनावराचा बाजार भरविला जातो.त्यामुळे मोठ्या रहदारीचे माडग्याळ गाव बनले आहे.येथे येणाऱ्या प्रवाशासाठी असणारे एसटी पिअप शेड अतिक्रमणामुळे गायब झाले आहे.त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर उभे राहून एसटी बसेसची वाट पहावी लागत आहे. कालबाह्य झालेल्या या पिक अप शेड विना उपयोगी झाले आहे.त्यामुळे सर्व सोयीयुक्त प्रशस्त एसटी बसस्थानक येथे बांधावे अशी मागणी होत आहे.