रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या वाढदिनी मंगळवारी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यानजत,प्रतिनिधी : रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार ता.21 जानेवारी रोजी जेष्ठ विचारवंत व इतिहास अभ्यासक श्रींमत कोकाटे यांचे व्याख्यान व कँलेडर प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.जत ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून राजकीय करिअरला सुरूवात केलेले संजय कांबळे यांनी जत ग्रामपंचायतीचे उपसंरपच, संरपच म्हणून प्रभावी काम केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या संजय कांबळे यांनी तालुक्यात रिपाईला रूजविण्याचे काम करताना आंबेडकरी जनतेसह गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले आहे.तालुक्यातील अनेक प्रश्नावर तीव्र आंदोलने करून प्रशासनाला तालुक्यातील दुर्लक्षित सामान्य जनतेला न्याय द्यावाच लागेल असे ठणकावून सांगत न्याय मिळविला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत रिपाइत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, विविध समित्या व आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने दिली आहे. जत शहरातील मनमिळावू व्यक्तिमहत्व म्हणून त्यांची ओळख आहे.गेली पाच तपे पुर्ण केलेले संजय कांबळे ता.21 जानेवारी पन्नासी ओंलाडत आहेत.त्यानिमित्त शहरासह तालुक्यात जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुख्य कार्यक्रम शहरातील साई प्रकाश मंगल कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. तेथेच कांबळे शुभेच्छा स्विकारतील.तालुक्यातील समर्थक,जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.