संख येथे 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहातसंख,वार्ताहर : संख अप्पर तहसील कार्यालय  येथे भारताचा प्रजासत्ताक दिनाचा 71 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आर.के. पाटील महाविद्यालय,श्री गुरुबसव विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज संख ,तसेच श्री  राजारामबापू पाटील माध्यमिक ज्यु.कॉलेज संख,व मराठी शाळातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले.यावेळी विविध मान्यवर,अधिकारी,प्राचार्य,शिक्षक उपस्थित होते.राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज अप्पाराया पाटील व सिद्धनिंगया जंगम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.संस्थेचे संस्थापक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील,संस्थेचे व्हा.चेअरमन सुभाष पाटील व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून ध्वजारोहन करण्यात आले.आर.के. पाटील महाविद्यालय व श्री गुरुबसव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज संख येथे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तमण्णा बागेळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.संस्थापक तथा माजी सभापती आर.के.पाटील,मुख्याध्यापक सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायत येथे संरपच मंगल पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उपसंरपच सदाशिव दर्गाकर,ग्रा.प.सदस्य,व विविध मान्यवर,मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संख येथील अप्पर तहसील कार्यालयात अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.